लडाख स्की आणि स्नोबोर्ड संस्थेनं कारगिलमध्ये कृत्रिमरित्या बर्फ बनवण्याचं यंत्र विकसित केलं आहे. लडाखमध्ये अलिकडच्या काळात अनिश्चित बर्फवृष्टी होत असल्यामुळे हिवाळी पर्यटन आणि क्रीडा या साठी ही निर्मीती महत्त्वाची आहे. सादिक अली आणि त्यांच्या चमूनं निर्माण केलेलं हे यंत्र कृत्रिम बर्फ तयार करण्यासाठी कॉम्प्रेसर आणि स्प्रे नोझल सारख्या सहज उपलब्ध घटकांपासून बनलं असून हे यंत्र एका तासात ७५ चौरस फूट क्षेत्रात एक इंच जाडीचा बर्फाचा थर तयार करू शकतं. या यंत्रामुळे बर्फवृष्टी कमी झाली तरीही स्कीईंग आणि हिवाळी क्रीडा प्रशिक्षण सुरु ठेवता येईल. या तंत्रज्ञानामुळे बर्फावरच्या खेळांना प्रोत्साहन मिळणार असून यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.
Site Admin | January 2, 2025 2:31 PM | #KargilVijayDiwas2024 | Kargil | Ladakh Ski and Snowboard
लडाख स्की आणि स्नोबोर्ड संस्थेनं कारगिलमध्ये कृत्रिमरित्या बर्फ बनवण्याचं यंत्र विकसित
