डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कुवेतच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान

येणाऱ्या काळात भारत आणि कुवेत यांचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज  कुवेत दौऱ्यात कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांच्यासोबत  औषधनिर्माण, माहिती-तंत्रज्ञान, फिन टेक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा अशा प्रमुख क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी या भेटीत दोन्ही देशांमधल्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा दिला आणि द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली. भारत आणि कुवेत यांनी द्विपक्षीय भागीदारी धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचं ठरवलं आहे, अशी माहिती मोदी यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. 

 

कुवेतमध्ये राहणाऱ्या सुमारे १० लाख भारतीयांची काळजी घेत असल्याबद्दल मोदी यांनी कुवेतच्या राजांचे आभार मानले तर कुवेतच्या प्रगतीत भारतीय समुदाय देत असलेल्या योगदानाचं कौतुक कुवेतच्या राजांनी केले. भारत हा कुवेत आणि आखाती देशांचा मोलाचा भागीदार असल्याचं ते म्हणाले. 

 

मोदी यांना आज कुवेतच्या -’द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा