डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 7, 2025 7:59 PM | Kusumagraj Award

printer

कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार अमिताभ गुप्ता आणि नीलिम कुमार यांना जाहीर

नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. त्यात २०२२ चा पुरस्कार प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना, तर २०२३ चा पुरस्कार आघाडीचे आसामी कवी नीलिम कुमार यांना जाहीर झाला आहे. 

रोख एक लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. 

अमिताभ गुप्ता हे १९६५ पासून कविता लिहीत असून त्यांचे आतापर्यंत २० हून अधिक कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. बंगालीतील लघुनियतकालिकांच्या आंदोलनातून काव्यलेखनाचा आरंभ करणारे अमिताभ गुप्ता नंतर समकालीन बंगाली कवितेच्या मध्यवर्ती प्रवाहातील लक्षणीय कवी म्हणून गणले जाऊ लागले. तर आसामी कवी नीलिम कुमार यांचे एकूण २४ कवितासंग्रह प्रकाशित असून त्यांच्या इंग्रजी अनुवादाचे तीन संग्रह, हिंदी अनुवादाचे तीन आणि पंजाबी अनुवादाचा एक संग्रह प्रकाशित झाला आहे. फ्रेंच, स्पॅनिश आणि मराठीसह अनेक भारतीय भाषांमधे त्यांच्या कवितांचे अनुवाद प्रसिद्ध आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा