कॉमेडियन कुणाल कामरा याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकार आणि आमदार मूरजी पटेल यांना उत्तर द्यायला सांगितलं. तसंच कुणाल कामराला १६ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आपल्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करायची मागणी कामरा यानं याचिकेद्वारे केली होती.
Site Admin | April 8, 2025 3:47 PM | Kunal Kamra | Mumbai high Court
कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाची सुनावणी
