कॉमेडियन कुणाल कामराने मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक वक्तव्य केल्याबद्दल कामराविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. राज्यघटनेनं दिलेल्या अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्यासह मूलभूत अधिकारांवर घाला घालणारी ही कारवाई असल्याचा दावा कामरानं गेल्या शनिवारी दाखल केलल्या याचिकेत केला आहे. या याचिकेवर २१ एप्रिलला सुनावणी होणार आहे. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी कामराविरुद्ध २४ मार्चला गुन्हा दाखल केला होता.
Site Admin | April 7, 2025 3:56 PM | Kunal Kamra | Mumbai high Court
कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधातल्या FIR ला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान
