महाकुंभमेळ्याला वाहिलेली ‘कुंभ वाणी’ नावाची नवीन वृत्तवाहिनी आकाशवाणीतर्फे सुरु होणार असून तिचं उद्घाटन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात नव्या ‘कुंभ मंगल धून’ चं पहिलं सादरीकरण होणार आहे. कुंभ वाणी या वाहिनीवर उद्यापासून २६ फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळ्यात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचं प्रक्षेपण केलं जाईल. या वाहिनीवर अमृतस्नानाचं थेट प्रसारण देखील ऐकता येईल.
आकाशवाणीच्या १०३ मेगाहर्टझ लहरींवरून , ‘न्यूज ऑन ए आय आर’ अँप वरून , तसेच ‘वेव्ज’ या ओ टी टी मंचावरून कुंभ वाणी चं प्रसारण ऐकता येईल.