महाकुंभ दरम्यान सुरू असलेल्या कुंभवाणी वाहिनीचं प्रसारण हे प्रसार भारतीच्या अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याच्या उद्देशाचे प्रतिक असल्याचं प्रतिपादन प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी केलं. प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मध्ये स्नान केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात सहगल बोलत होते.
कुंभवाणी या वाहिनीचं कौतुक करताना थेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी हे महत्वाचं केंद्र म्हणून उदयाला आल्याचं ते यावेळी म्हणाले. सहगल यांनी नैनी अरेल संगम सेक्टर 4 इथं बांधलेल्या आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राची त्यांनी पाहणी केली आणि प्रसारण यंत्रणेचा आढावा घेतला. भविष्यातही अशा प्रकारचे नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू राहिले पाहिजेत जेणेकरून अधिकअधिक लोकांना याचा फायदा होईल असंही ते यावेळी म्हणाले.