कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू शिवाजी कोकाटे यांना ठोठावलेल्या दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं आज स्थगिती दिली. यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरची टांगती तलवार दूर झाली आहे. कोकाटे यांच्या विरोधात दाखल झालेल्या तिन्ही हस्तक्षेप याचिकाही न्यायालयानं फेटाळून लावल्या. सुमारे २० वर्षांपूर्वी खोटी कागदपत्रं देऊन मुख्यमंत्री कोट्यातली सदनिका घेतल्याप्रकरणी कोकाटे बंधूंना न्यायालयानं २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
Site Admin | March 5, 2025 3:50 PM | Manikrao Kokate
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती
