राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आज जाहीर झाले. यावेळी विविध प्रवर्गांमधे ११० जणांची पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. २०२३-२४ या वर्षासाठी ३८ प्राथमिक शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ३९ माध्यमिक शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक एकूण आदर्श शिक्षिका ८, विशेष शिक्षक कला आणि क्रीडा दोन, दिव्यांग शिक्षक किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेमधले शिक्षक एक, तर स्काऊट आणि गाईडसाठी प्रत्येकी १ अशा १०९ शिक्षकांची निवड समितीनं केली आहे. तर वर्धा जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षकासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार २०२२-२३ चा पुरस्कारही यावेळी जाहीर केला आहे. पुरस्कार वितरण येत्या ५ सप्टेंबरला म्हणजे शिक्षक दिनी मुंबईत होणार आहे.
Site Admin | September 2, 2024 8:27 PM | Teacher Merit Award