डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सातारा जिल्ह्यातील नद्यांजवळील शेतकऱ्यांनी सिंचन पंप सुरक्षित स्थळी हलवण्याचे कोयना सिंचन विभागाचे आदेश

सातारा जिल्ह्यातल्या कोयना, तारळी, उत्तरमांड, वांग, उत्तरवांग नआद्या तसंच या नद्यांवरचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि महिर, चाफळ आणि चाळकेवाडी तलाव इत्यादी ठिकाणी पुरामुळं शेतकऱ्यांच्या सिंचन पंपांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणचे उपसा सिंचन योजना पंप शेतकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात स्वखर्चानं सुरक्षित स्थळी हलवावे. पुरामुळं पंपाचं नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांची राहील, असं कोयना सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी कळवलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा