येत्या १ जानेवारीला कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन, पुणे ग्रामीण पोलिसांद्वारा चोख बंदोबस्त राखला जाणार आहे. वाहतुक आणि गर्दीच्या नियोजनासाठी ८०० पोलीस कर्मचारी तैनात करणार असल्याचं पुणे ग्रामीण पोलीसांनी कळवलं आहे. बंदोबस्तात तैनात करण्यात येणार आहे. यासोबतच सोहळ्याच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घातपात विरोधी पथकही तैनात केलं जाणार असल्याचं पोलीस प्रशासनानं कळवलं आहे. कोरेगाव भिमा परिसरात 45 ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. 300 सीसीटीव्ही, 10 ड्रोन, आणि 50 पोलीस टॉवरद्वारे परिसरात देखरेख ठेवली जाईल. चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष पोलीस पथकही तैनात असेल असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.
अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं विजयस्तंभ सुविधा हे मोबाईल ॲपही उपलब्ध करून दिलं गेलं आहे.