दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्रपती पार्क ग्युन हे यांनी सत्तारूढ पीपीपी अर्थात पीपल पॉवर पार्टीला एकजुटीनं राहण्याचं आवाहन केलं आहे. त्या त्यांच्या डेगू इथल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पीपीपी च्या नेत्यांना संबोधित करत होत्या. विरोधी पक्षांच्या विरोधाला न जुमानता या पक्षानं आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असं ग्युन हे यांनी यावेळी सुचवलं. राष्ट्रपती युन सुक येऊल यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या महाभियोगाबद्दल ग्युन हे यांनी हळहळ व्यक्त केल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. येऊल यांनी गेल्या ३ डिसेंबरपासून दक्षिण कोरियात लष्करी कायदा लागू केला होता.
Site Admin | March 3, 2025 7:41 PM | south koria
पीपल पॉवर पार्टीला एकजुटीनं राहण्याचं आवाहन- पार्क ग्युन हे
