नौदलाच्या खुल्या समुद्रातील नौकानयन ‘कोकण रत्न’ मोहिमेला आज रत्नागिरीत अल्ट्रा टेक जेट्टी इथं सुरुवात झाली. या मोहिमेला ‘हमारा समंदर- हमारी शान’ असं नाव देण्यात आलं आहे. समुद्राची स्वच्छता, तस्करी आणि सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. १० दिवस चालणारी ही मोहीम रत्नागिरीहून बोऱ्यापर्यंत जाणार असून एकूण १२२ सागरी मैलांचं अंतर पार करून परतणार आहे. किनारपट्टीवरील सर्व गावं, सार्वजनिक ठिकाणं आणि शाळांमध्ये कविता, व्याख्यानं आणि नाटकांच्या माध्यमातून सागरी पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या संघात एकूण ६० निवडक कॅडेट्सचा समावेश असून महाराष्ट्र एनसीसी युनिटमधून ३१ मुले आणि २९ मुली यांचा समावेश आहे.
Site Admin | November 6, 2024 6:29 PM | Hamara Samunder – Hamari Shaan | Konkan Ratna