कोल्हापूर जिल्ह्यात यात्रा, उत्सव, विविध पक्षांची आंदोलन सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी संपूर्ण जिल्ह्यात उद्या सकाळी ६ वाजल्यापासून ९ जानेवारी २०२५ ला रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम सर्व जाती धर्माचे सण,उत्सव,जयंती, यात्रा शांततामय मार्गानं साजरे करण्यासाठी जमलेल्या जनसमुदायासाठी, लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, अंत्ययात्रा इत्यादींना लागू नाही
Site Admin | December 27, 2024 6:55 PM | Kolhapur
कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून ९ जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश जारी
