डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

किसान सन्मान निधीची रक्कम १५ हजार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आश्वासन

महायुती सत्तेवर आल्यास किसान सन्मान निधीची रक्कम १२ हजारावरुन १५ हजार करण्याचं आश्वासन मोदी यांनी नाशिक शहरात पंचवटी इथल्या प्रचारसभेत दिलं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडें यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आदरांजली वाहिली. जनहितासाठी उज्ज्वला योजना, जलजीवन मिशन, नळाद्वारे घराघरात पिण्याचं पाणी, मोफत अन्नधान्य, पीएम आवास योजनेत घर, कापूस-धान-सोयाबीन पिकांना अधिक हमी दर, दुधाच्या दरात वाढ तसंच शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यातीवरचे निर्बंध हटवण्याचा निर्णय  सरकारने  घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला.

 

महाविकास आघाडीकडे घोटाळे, भ्रष्टाचार, जातीजातीत भांडण लावून समाजात फूट पाडणं याशिवाय काही नाही असही ते म्हणाले. यशस्वी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेला विरोध करण्यासाठी विरोधक न्यायालयापर्यंत गेले असले तरी महायुती सरकार ही योजना सुरु ठेवणार असल्याचं  त्यांनी सांगितलं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील आदि उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा