अमेरिकेत कोलंबिया इथं झालेल्या कॉप सिक्सटिन परिषदेच्या सदस्य देशांच्या बैठकीत, देशाचे पर्यावरण राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंग यांनी भारताचा अद्ययावत राष्ट्रीय जैवविविधता धोरण आणि कृती आराखडा मांडला. हा दस्तऐवज म्हणजे पर्यावरणीय आव्हानांचे अस्तित्व मान्य करून, त्याआधारे पुढची रणनिती ठरवण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचे सिंग यांनी यावेळी सांगितले. हे दस्तऐवज म्हणजे जैवविविधाविषयक परिसंस्था पूर्वपदावण आणणं, विविध प्रजातींचं पुनर्अस्तित्व निर्माण करणं तसंच संवर्धनाच्या सामुदायिक उपक्रमांच्या माध्यमातून समोर असलेल्या आव्हानांचा सामना करण्याचं माध्यम असल्याचं ते म्हणाले. ऱ्हास होत असलेल्या जैवविविधता परिसंस्थांचं पुनरुज्जीवन, पाणथळ जागांचं संरक्षण आणि सागरी आणि किनारपट्टीच्या क्षेत्रांच्या शाश्वत व्यवस्थापनावर या धोरणात भर दिला आहे, तसंच २०३० पर्यंत जैवविविधतेचा ऱ्हास रोखत, ती दूर करण्याच्या दृष्टीनं हा कृती आराखडा महत्त्वाचा असल्याची बाब त्यांनी अधोरेखीत केली.
Site Admin | November 3, 2024 3:56 PM | KIRTI VARDHAN-NBSAP