नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्याने राज्यातून चौथा तर संपूर्ण देशातून ५१ वा क्रमांक पटकावला आहे. “संपूर्णत: अभियानात सहा सूचकांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन काम करण्यात आलं. यात प्रामुख्याने प्रसूतीपूर्व काळजीसाठी नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची टक्केवारी ही ९४ टक्क्यांवरुन ९७ टक्के, मधुमेहासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची, तसंच उच्च रक्तदाबासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी ही ८५ वरुन १०० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पूरक पोषण आहार घेणार्या गर्भवती महिलांची टक्केवारी १०० टक्के कायम ठेवण्यात यश आलं आहे. मृदा आरोग्य पत्रिकेची टक्केवारी शून्य वरुन १०० टक्के पूर्ण करण्यात आली आहे. तालुका स्तरावरील प्रगती वेगवान करण्यासाठी विविध विकास भागीदारांसोबत काम करुन सुधारणा करण्यात येत आहे.’’
Site Admin | December 4, 2024 9:23 AM | आकांक्षित तालुका कार्यक्रम | किनवट | नांदेड