डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आज महाकुंभला भेट देणार

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आज प्रयागराज इथं महाकुंभला भेट देणार असून ते त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करतील. प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळयात काल वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दोन कोटी 33 लाख भाविकांनी अमृत स्नान केलं. राज्य सरकारनं भाविकांच्या सुरक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. अमृत स्नानाची सुरूवात 13 आखाड्यांच्या संत, साधूंनी केली आणि त्यानंतर भाविकांनी स्नान केलं. यावेळी संतांवर पुष्पवृष्टी कऱण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव संगमस्थानावर पोहोचण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गाचा वापर करण्यात आला होता. या परिसराच्या सुरक्षेससाठी ड्रोन, हेलिकॉप्टर आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्यात आली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा