आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे भारताने बालमृत्यू रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्रांनी एका अहवालात काढले आहेत. आरोग्य क्षेत्रात धोरणात्मक गुंतवणूक करून भारताने लाखो बालकांचे प्राण वाचवल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
भारताने २००० पासून पाच वर्षांखालच्या बालकांच्या मृत्यूदरात ७० टक्के आणि नवजात बालकांच्या मृत्यूदरात ६१ टक्के घट करण्यात यश मिळवलं आहे. यासाठी आरोग्य सुविधांची व्याप्ती वाढवण्यात आली, पायाभूत सुविधा आणि संसाधनाच्या विकासासाठी उपाययोजना केल्या गेल्या असंही यात म्हटलं आहे.
यासाठी संयुक्त राष्ट्रांनी आयुष्मान भारत योजनेचा दाखला दिला. या योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी साडे पाच हजार अमेरिकन डॉलरचं संरक्षण दिलं जातं असं या अहवालात म्हटलं आहे.