पेरू मधे लीमा इथं आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेतर्फे सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठगट नेमबाजी स्पर्धेत भारताच्या खुशीनं महिलांच्या ५० मीटर रायफल ३ प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या बरोबरच भारताची पदकसंख्या १५ झाली आहे. यात १० सुवर्ण, १ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. सांघिक प्रकारात १ हजार ७५७ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
Site Admin | October 3, 2024 3:30 PM | bronze medal | rifle | जागतिक कनिष्ठगट नेमबाजी स्पर्धा
जागतिक कनिष्ठगट नेमबाजी स्पर्धेत भारताच्या खुशीनं पटकावलं रायफल ३ प्रकारात कांस्य पदक
