भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पहिल्यावहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. काल रात्री झालेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघांनी वेग, रणनिती आणि कौशल्याचं उत्तम प्रदर्शन केलं. भारतीय पुरुष संघाने नेपाळला ५४-३६ असं नमवत विश्वचषकावर नाव कोरलं तर महिला संघानं नेपाळच्या महिला संघाला ७८-४० अशी मोठ्या फरकानं मात दिली. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यांमध्ये भारतानं पहिल्यापासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि नेपाळला रोखून धरलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांचं अभिनंदन केलं आहे. महिला आणि पुरुष संघाचा विजय देशाच्या तरुण पिढीला प्रेरणादायक ठरेल असे कौतुकोद्गार राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी काढले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दोन्ही संघांचं कौतुक केलं आहे.
Site Admin | January 20, 2025 7:09 PM | India | KhoKho WorldCup