खो-खो विश्वचषक स्पर्धेला काल नवी दिल्ली इथे सुरुवात झाली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी. टी. उषा आणि भारतीय खोखो महासंघाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल यांनी मशाल प्रज्ज्वलित करून स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन केलं.
या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाने नेपाळवर ४२-३७ असा विजय मिळवला. भारतीय संघाचा आदित्य गणपुले याची सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली तर शिवा रेड्डी सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू ठरला. नेपाळच्या संघाकडून रोहित कुमार या खेळाडूला सर्वोत्तम बचाव करणारा खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं.
भारताच्या महिला संघाचा पहिला सामना आज नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी मैदानावर दक्षिण कोरियासोबत होणार आहे. तर पुरुषांच्या संघाची गाठ आज रात्री सव्वा आठ वाजता ब्राझीलच्या संघाशी पडणार आहे.