जगन्नाथ पुरी इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत पुरुष संघानं पश्चिम बंगालवर मात केली.
तर महिला गटात महाराष्ट्र संघानं कोल्हापूरचा पराभव केला. आज उपांत्य फेरीचे सामने होणार असून राज्याच्या पुरुष संघाचा ओडिशा संघाबरोबर आणि महिला संघाचा दिल्लीच्या संघाबरोबर सामना होणार आहे.