केंद्रसरकारच्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांना काल लेह -लडाख इथल्या नवांग डोरजी क्रीडा संकुल इथ सुरुवात झाली. 27 जानेवारीपर्यंत होणाऱ्या या क्रीडा स्पर्धांच्या पहिल्या टप्प्यात मुख्यतः बर्फावर खेळल्या जाणाऱ्या आईस हॉकी आणि स्केटिंग याच्या स्पर्धा होणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान जम्मू काश्मीर इथ 4 प्रकारच्या बर्फातील क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत यामध्ये देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 19 पथकातील 4 शे हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.