नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समधे आज पाचव्या दिवशी पॉवरलिफ्टर्स आणि नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सुमन देवींनी ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं असून जास्मिन मिचलिनने रौप्यपदक आणि भारती अग्रवालनं कांस्यपदक पटकावलं. पुरूष ५९ किलो वजनी गटात गुलफाम अहमदने सुवर्णपदक पटकावलं असून व्ही. सरवनने रौप्यपदक आणि गौरवने कांस्यपदक पटकावलं. सीमा राणीने ६१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं असून झैनब खातूनने रौप्यपदक आणि एम. नाथियाने कांस्यपदक पटकावलं आहे. जॉबी मॅथ्यूने ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं असून अरविंद मकवाना यानं रौप्यपदक आणि गदाधर साहू यांनी कांस्यपदक पटकावलं.
नेमबाज निहाल सिंगने मिश्र २५ मीटर पिस्तूल एसएच१ प्रकारात सुवर्णपदक पटकावलं, अहमद भट्टने रौप्यपदक आणि संदीप कुमारने कांस्यपदक पटकावलं. त्याबरोबरच मोना अग्रवालने मिश्र ५० मीटर रायफल प्रोन एसएच१ प्रकारात सुवर्णपदक पटकावलं असून आनंदा कृष्णनने रौप्यपदक आणि सचिन सिद्धनवरने कांस्यपदक पटकावलं.