दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धांच्या दुसऱ्या आवृत्तीला आजपासून नवी दिल्ली इथं प्रारंभ होत आहे. या स्पर्धांमध्ये 36 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील १३०० हून अधिक खेळाडू सहभागी घेणार आहेत. 27 तारखेपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. नवी दिल्ली इथं जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम आणि डॉक्टर करणसिंग नेमबाजी संकुल अशा तीन ठिकाणी या स्पर्धा पार पडणार आहेत. दरम्यान, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे 78 क्रीडापटू पात्र ठरले आहेत. सर्वाधिक 36 खेळाडू अॅथलेटिक्समध्ये भाग घेणार आहेत. पॅरीस पॅरा ऑलिम्पिकपटू सुकांत कदम, संदिप सलगर, स्वरूप उन्हाळकर, दिलीप गावीत, भाग्यश्री जाधव यांच्याकडून पदकांची अपेक्षा आहे.
Site Admin | March 20, 2025 10:22 AM | Khelo India Para Games
खेलो इंडिया स्पर्धांच्या दुसऱ्या आवृत्तीला आजपासून प्रारंभ
