खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. आज शेवटच्या दिवशी झालेल्या खेळांमध्ये टेबिल टेनिसच्या अंतिम फेरीत शशिधर कुलकर्णी, दत्तप्रसाद ज्योतिराम चौगुले आणि विश्वविजय तांबे यांनी विविध श्रेणींमध्ये सुवर्णपदकं जिकंली. तर महिलांच्या गटात देवयानी वाल्हे हिनंही सुवर्णपदक जिंकलं.
या स्पर्धेत महाराष्ट्र ४३ पदकासंह पदकतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यात १८ सुवर्ण, १३ रौप्य आणि १२ कास्य पदकांचा समावेश आहे. पहिल्या स्थानावर हरयाणा असून त्यानंतर तामिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान यांचा समावेश आहे.