खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत काल पंजाबच्या जसप्रीत कौरनं भारोत्तोलनात नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. 45 किलो वजनी गटात स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून तिने शंभर किलोपेक्षा जास्त वजन उचललं.
पुरुषांच्या 54 किलो वजनी गटात मनिषनं 166 किलो वजन उचलून नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण कामगिरी केली. जम्मू काश्मीरच्या शीतल देवीनं तीरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकावलं.
महाराष्ट्राच्या आदिल मोहम्मद नाझिर अन्सारी यांने तीरंदाजीमध्ये पुरुषांच्या W1 प्रकारात आपलं वर्चस्व कायम राखत आणखी एक सुवर्णपदक पटकावलं.
तीरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात पुरुषांच्या गटात झारखंडच्या विजय सुंदी यानं आणि महिलांच्या गटात हरियाणाच्या पूजानं सुवर्णवेध घेतला.
नेमबाजीमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल SH1 प्रकारात उत्तर प्रदेशच्या सुमेधा पाठक हिनं सुवर्ण पदक मिळवलं. तर पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रोन SH2 प्रकारात महाराष्ट्राच्या सागर कटाळे यानं सुवर्णपदक पटकावलं.