खरीप पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७ लाख हेक्टरनं वाढ झाली आहे. खरीप लागवडीखालचं क्षेत्र गेल्या वर्षी ३३१ लाख हेक्टर इतकं होतं, यंदा ते वाढून ३७८ हेक्टर इतकं झालं आहे. यापैकी ६० लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची, तर ३६ लाख हेक्टर क्षेत्रात डाळींची लागवड करण्यात आली असल्याचं कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत दिसत आहे.
Site Admin | July 8, 2024 8:05 PM | कृषी मंत्रालय | खरीप पिक