ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक केसरी पाटील यांचं निधन’केसरी टूर्स’ च्या माध्यमातून पर्यटकांना जगभर पोहोचवणारे केसरी पाटील यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते.संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पर्यटन व्यवसायातले रोजगार आणि व्यवसाय तसंच व्यवस्थापन संधीची माहिती देऊन अनेकांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा देण्यात ते मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केसरी पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
पर्यटन क्षेत्रातल्या संधीची ओळख करून देणारे आणि महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे उद्यमी म्हणून केसरी पाटील यांचं नाव सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली आहे. तर केसरी पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनक्षेत्राचा दीपस्तंभ अस्तंगत झाला आहे, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.