राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नुकत्याच आगीच्या तडाख्यात सापडून मोठं नुकसान झालेल्या कोल्हापूरमधल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली. या नाट्यगृहाच्या माध्यमातून शाहू महाराजांनी निर्माण केलेला तंत्रज्ञानाचा आविष्कार लवकरच पुन्हा उभा करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नुकतीच भेट देऊन या नाट्यगृहाच्या नुकसानीची पाहणी केली आहे. हे नाट्यगृह जसं होतं तसं पुन्हा उभारण्यासाठी त्यांनी वीस कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.