आज जगभरातील केरळवासी पारंपारिक नवीन वर्ष विशु साजरं करत आहेत. विशु म्हणजे विपुलता आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक असून या शुभ दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्णाची कानी कोन्नाची फुले, कानी वेलारी, फळे, भाज्या, सोने, नाणी इत्यादींनी पूजा केली जाते. गुरुवायूर, श्री पद्मनाभस्वामी मंदिर, सबरीमाला इत्यादी प्रमुख मंदिरांमध्ये आज ‘विशु कानी’ आणि विशेष विधी आयोजित केले जात आहेत, तसंच सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत आहेत.
Site Admin | April 14, 2025 10:44 AM | Kerala New Year
आज केरळ पारंपारिक नवीन वर्ष ‘विशु’
