वायनाड दुर्घटनेविषयी आज राज्यसभेत चर्चा झाली. नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना केरळ सरकारला देऊनही त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय केले नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेत बोलताना सांगितलं. केरळमध्ये जोरदार पाऊस आणि दरड कोसळण्याची शक्यता असल्याचं केरळ सरकारला २३, २४ आणि २५ जुलै रोजी कळवलं होतं, लोकांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, हेही सांगण्यात आलं होतं, मात्र केरळ सरकारनं लोकांना स्थलांतरित केलं नाही, असं शहा म्हणाले. गुजरात आणि ओदिशासारख्या राज्यांनी केंद्र सरकारनं दिलेला इशारा गांभिर्यानं घेतल्यानं तिथलं नुकसानं टळलं, असंही ते म्हणाले.
दुर्घटना झाल्यानंतर केरळला आवश्यक ती सर्व मदत पुरवल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली.