वरिष्ठ स्तरावरच्या पुरुषांच्या हँडबॉल राष्ट्रीय चँपियन स्पर्धेत केरळनं चंडीगढचा ३४ – ३१ नं पराभव करत विजेतेपद पटकावले. हा सामना काल केरळच्या चांगनासेरी मध्ये खेळवला गेला. केरळचा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात सैन्यदलाचा पराभव करत केरळचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता तर चंदिगढनं भारतीय रेल्वेच्या संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
Site Admin | December 30, 2024 1:40 PM | Handball Championship title | Kerala