डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वायनाड,आणि हिमाचल प्रदेशात भूस्खलन स्थळी बचावकार्य सुरु

केरळमधे वायनाड इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मृतदेह शोधण्याचं काम आज सातव्या दिवशीही सुरू आहे. या भागात शंभरहून अधिक जण बेपत्ता आहेत. काल ड्रोनच्या मदतीनं मृतदेह शोधण्याचं काम करण्यात येत होतं. दरड कोसळण्यापूर्वीच्या परिसराचा नकाशा आणि दरड कोसळल्यानंतर बदलल्या स्थितीची तुलना करून शोध घेतला जात आहे. या कामासाठी सैन्याची अतिरिक्त कुमक आणि श्वानपथकाला मेरठहून पाचारण केलं आहे.

मेपडी इथं ठेवलेल्या ६७ मृतदेहांपैकी ८ जणांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती आकाशवाणीच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. केदारनाथ धाम यात्रा मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंचा शोध आजही सुरू आहे. या परिसरातलं हवामान स्वच्छ झाल्यानंतर आज सकाळी सुरक्षादलांच्या देखरेखीखाली एमआई १७ आणि चिनूक हेलीकॉफ्टरनं १०० जणांना रवाना करण्यात आलं आहे. त्याबरोबरच मंदाकिनी नदीच्या जवळच्या जंगलामध्ये सुरक्षा दलांची शोधमोहीम अजूनही सुरू आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा