समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केलं. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं पुण्यातल्या फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना, अशा प्रकारचा पुस्तक महोत्सव पुण्यापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं आयोजन केले पाहिजे, याकरीता शासन आपल्या पाठीशी नेहमी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
ग्रंथाविषयी आपल्या भावना उपस्थितांशी बोलतना व्यक्त केल्या ते म्हणाले. पुस्तक प्रदर्शनानिमित्त लावण्यात आलेल्या विविध दालनांना फडणवीस यांनी भेट दिली आणि प्रकाशक, मुद्रक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या पुणे कार्यालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबाबतचे पत्र दिले. महोत्सवाच्या प्रवेशद्वारासमोर एक हजार पुस्तकांचा वापर करून सरस्वतीचं चिन्ह तयार करण्यात आलं आहे.