डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्यामुळे यात्रा तात्पुरती स्थगित

उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्यामुळे यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातले रस्ते, पूल, विजेच्या तारा आणि पाणीपुरवठा वाहिन्यांचं तसंच शेतजमिनींचं मोठं नुकसान झालं आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, डीडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने एकत्रितपणे राबवलेल्या बचाव मोहिमेत केदारनाथ यात्रेच्या मार्गावर अडकलेल्या २ हजाराहून जास्त यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. वायुसेनेच्या विमानांनी भिंबली, रामबाडा आणि लिंचोली इथून अंदाजे ४२५ जणांची सुटका केली, तर सोनप्रयाग आणि भिंबली दरम्यानच्या ११ शे यात्रेकरूंना काल सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आपत्तीग्रस्त भागाची हवाई पाहणी करून संबंधित यंत्रणांकडून प्रत्यक्ष मदत कार्याचा आढावा घेतला.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा