कझाकस्तानमध्ये, काल झालेल्या विमान अपघातात ३८ नागरिक ठार झालेयाची प्राथमिक माहिती अझरबैजानच्या अधिकाऱ्यांनी दिली. अझरबैजान एअरलाइन्सच्या या प्रवासी विमानानं अकताऊशहराजवळ आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला मात्र विमानाला आग लागली आणि अपघात झाला अशी माहिती कझाकस्तानच्या माध्यमांनी दिली आहे. हे विमान रशियातील ग्रोझनीला जात होते पण दाट धुक्यामुळे ते वळवण्यात आले. रशिया, कझाकस्तान आणि किर्गिस्तानचे नागरिक आणि विमानातील कर्मचारी असं ७० जण प्रवास करत होते. अझरबैजान आणि कझाकस्तान या दोन्ही देशांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे.
Site Admin | December 26, 2024 9:17 AM | kazakhstan place crash
कझाकस्तानमध्ये झालेल्या विमान अपघातात ३८ नागरिक ठार
