दिल्लीमध्ये उद्यापासून कावड यात्रेला सुरवात होणार आहे. या यात्रेसाठी कावड यात्रेकरू मोठ्या संख्येनं दिल्लीमध्ये पोहोचतात, त्यांपैकी काहीजण दिल्लीच्या सीमेवरून हरयाणा आणि राजस्थानला रवाना होतात. यंदा या यात्रेसाठी सुमारे १५ ते २० लाख यात्रेकरू येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. यात्रेच्या काळात यात्रेकरू तसंच दिल्लीतल्या सामान्य वाहतूक आणि वर्दळीला कोणतीही अडचण होऊ नये यादृष्टीनं, यात्रेकरू आणि इतरांसाठी रस्त्यांची स्वतंत्र व्यवस्था असेल असं नियोजन दिल्ली वाहतूक पोलिसांनी केलं आहे. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी आपल्या प्रवासाचं आगाऊ नियोजन करावं असं आवाहनही दिल्ली वाहतूक पोलीसांनी केलं आहे.
Site Admin | July 21, 2024 8:15 PM | Kavad Yatra
दिल्लीमध्ये उद्यापासून कावड यात्रेला सुरवात होणार
