प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि कदंब नृत्य केंद्राच्या संस्थापक कुमुदिनी लाखिया यांचं आज निधन झालं. त्या ९५ वर्षांच्या होत्या. कथ्थक नृत्यामधल्या त्यांच्या कार्यासाठी यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. कुमुदिनी लखिया यांचा जन्म १९२९ मध्ये झाला. त्यांनी राम गोपाल यांच्यासोबत नृत्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. जयपूर घराण्याचे उस्ताद आणि पंडित शंभू महाराज यांच्याकडून त्यांनी कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. दोन दशकांहून अधिक काळ कथ्थक सादरीकरणाचे कार्यक्रम केल्यानंतर, १९६७ मध्ये त्यांनी अहमदाबादमध्ये कदंब नृत्य केंद्राची स्थापना केली. त्यांनी मुझफ्फर अली यांच्या ‘उमराव जान’ या चित्रपटामध्ये गोपी कृष्ण यांच्यासोबत नृत्यदिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे.
कुमुदिनी लाखिया यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.