राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं जम्मू-कश्मीरमधे दहशतवाद केवळ नियंत्रितच केला नाही, तर कश्मिर खोऱ्यातली दहशतवादी परिसंस्थाच उध्वस्त केली आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत जम्मू-कश्मीरवरच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनानंतर बोलत होते.
३७० वं कलम हटवल्यानंतर दहशतवादी कारवायांमधे ७० टक्के इतकी लक्षणीय घट दिसून आली आहे. त्याबरोबरच जम्मू-कश्मीरचा विकासही सुुरु झाला आहे, असं ते म्हणाले.