केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज काशी तामिळ संघम ३.० आणि केटीएस पोर्टलचं नवी दिल्लीत उद्घाटन केलं. पुढच्या महिन्यात १५ ते २४ तारखेपर्यंत यंदा काशी तामिळ संघम पाळला जाईल असं ते म्हणाले. या उपक्रमात १२०० प्रतिनिधी, कारागीर आणि नवोन्मेषी सहभागी होणार आहेत. औषधांची सिद्धचिकित्सा पद्धती आणि शास्त्रीय तामिळ साहित्यात अगस्त्य ऋषींंचं योगदान ही यंदाच्या उपक्रमाची संकल्पना आहे. तामिळ विद्यार्थ्यांची २०० जणांची तुकडी वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्येतल्या स्थानिक सहलींचा आनंद घेणार आहे. kashitamil.iitm.ac.in.या संकेतस्थळावर या उपक्रमासाठी येत्या एक फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येईल.
Site Admin | January 15, 2025 8:07 PM | Kashi Tamil Sangamam 3
मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते काशी तामिळ संघम ३.० आणि केटीएस पोर्टलचं उद्घाटन
