प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथं आयोजित बीएपीएस कार्यकर्ता सुवर्ण महोत्सवाला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केलं. रशिया युक्रेन युद्धादरम्यान भारतीयांना सुरक्षित मायदेशी परतण्यात बीएपीएस च्या कार्यकर्त्यानी केलेल्या मदतीची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली. भारताच्या ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेची जगभरात चर्चा होत असल्याचं त्यांनी सांगितलं. अबू धाबीमध्ये नुकत्याच उभारण्यात आलेल्या स्वामीनारायण मंदिरासारख्या उपक्रमातून जग भारताची सांस्कृतिक विविधता आणि अध्यात्मिक वारसा जाणून घेत आहे, असंही ते म्हणाले. युवा बुद्धिमत्तेला नव्या संधी मिळवून देणाऱ्या विकसित भारत युवा नेते संवाद कार्यक्रम जानेवारीमध्ये आयोजित केला जाणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
Site Admin | December 7, 2024 8:01 PM | Bochasanvasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha | Prime Minister