कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यात येल्लापूरजवळ झालेल्या रस्ता अपघातातल्या मृतांची संख्या १४ झाली आहे. आठवडी बाजाराकरता फळं आणि भाज्या वाहून नेणारा ट्रक सावनूरहून कुमठ्याला जात असताना दरीत कोसळून हा अपघात झाला. त्यात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर जखमींपैकी ५जण रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावले. आणखी १५ जणांवर उपचार सुरु आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक प्रकट केला आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये अर्थसहाय्य प्रधानमंत्री राष्ट्रीय आपत्ती निधीतून जाहीर केलं आहे.