मैसूरू शहर विकास प्राधिकरण जमीन प्रकरणी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची चौकशी लोकायुक्त पोलिसांनी करावी, असे आदेश एका विशेष न्यायालयानं दिले आहेत. मैसूरूच्या लोकायुक्त पोलिसांनी या प्रकरणी २४ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करावा, असंही न्यायाधीश संतोष भट यांनी आदेशात सांगितलं. सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध चौकशी करण्याची राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी दिलेली परवानगी वैध असल्याचा निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयानं कालच दिला होता. मैसूरू शहर विकास प्राधिकरणानं १४ जमिनी सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी. एम. पार्वती यांच्या नावे केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
Site Admin | September 25, 2024 7:52 PM