कल्याण-शिळफाटा रस्त्यावर निळजे रेल्वे उड्डाणपुलाचं काम उद्या रात्री १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. हे काम १० फेब्रुवारी रात्री १२ वाजेपर्यंत चालणार असल्यानं या कालावधीत पलावा जंक्शनच्या दिशेनं होणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवणार असल्याची माहिती कल्याण-कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली. या कामामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे इथून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकडे जाणाऱ्या आणि शिळफाटा मार्गे मुंबईला जाणाऱ्या वाहनांचा मार्ग बदलला आहे.
Site Admin | February 4, 2025 7:41 PM | Kalyan-Shilphata
कल्याण-शिळफाटा मार्ग १० फेब्रुवारीपर्यंत वाहतूकीसाठी बंद
