आचार्य विनोबा भावे यांच्या अनुयायी कालिंदीताई यांचं नुकतंच पवनार आश्रमात निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. कालिंदीताई विनोबांच्या भूदान पदयात्रेत सहभागी झाल्या. कालिंदीताईंच्या दैनंदिनीच्या आधारे लिहिले गेलेलं ‘विनोबांची पूर्व पाकिस्तान भूदान-पदयात्रा’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. पवनार आश्रमातून प्रकाशित होणाऱ्या ‘मैत्री’ मासिकाच्या त्या दीर्घकाळ संपादक होत्या. विनोबांच्या अनेक पुस्तकांचं त्यांनी संपादन केलं.
Site Admin | April 9, 2025 3:03 PM | आचार्य विनोबा भावे | कालिंदीताई | निधन
आचार्य विनोबा भावे यांच्या अनुयायी कालिंदीताई यांचं निधन
