कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे, भारत आणि चीन दरम्यान थेट विमान सेवा आणि परस्परांच्या देशातल्या नद्यांची माहिती एकमेकांना देण्याविषयी भारत आणि चीनमध्ये सहमती झाली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात काल झालेल्या चर्चेत यावर सहमती झाली. दोन्ही देशाचे राजनैतिक संबंध सुरू व्हायला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं दोन्ही देशातले संबंध आणखी दृढ करणे आणि सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही दोन्ही देशात सहमती झाली. व्यापार आणि अर्थव्यवस्थेच्या संदर्भात दोन्ही देशांमध्ये अनिर्णित असलेल्या मुद्द्यांवरही चर्चा झाली आणि दीर्घकालीन, पारदर्शक तोडगा काढण्यावर भर दिला गेला. मिस्री यांनी या भेटी दरम्यान चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या पॉलिट ब्युरोच्या सदस्यांचीही भेट घेतली.
Site Admin | January 28, 2025 2:51 PM | Kailash Mansarovar Yatra
कैलास मानसरोवर यात्रा सुरू होणार, भारत-चीनमध्ये सहमती
