इंग्लंडमधील वुल्व्हरहॅम्प्टन इथं झालेल्या 2025 च्या पुरुष आणि महिला कबड्डी विश्वकरंडक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावलं आहे. पुरुष संघानं काल अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडचा 44-41 असा पराभव केला. यापूर्वी, भारतीय महिला संघानं त्याच ठिकाणी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा 57-34 असा दणदणीत पराभव केला. आशियाच्या बाहेर पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेत बर्मिंगहॅम, कोव्हेंट्री, वॉल्सॉल आणि वुल्व्हरहॅम्प्टन इथं सामने पार पडले. 2019 मध्ये मलेशियानं आयोजित केलेल्या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत भारतानं पुरुष आणि महिला दोन्ही गटात विजेतेपद पटकावलं होतं.
Site Admin | March 24, 2025 9:46 AM | Kabaddi World Cup 2025
कबड्डी विश्वकरंडक स्पर्धेत भारताला पुरुष आणि महिला गटात विजेतेपद
