इंग्लंडमध्ये आजपासून कबड्डीची दुसरी विश्वचषक स्पर्धा सुरू झाली. भारताच्या पुरूष संघानं इटलीचा ६४-२२ असा पराभव करत आज विजयी सलामी दिली तर स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं हंगेरीला १०१-२५ अशा गुणफरकानं पराभूत केलं. या स्पर्धेत सात दिवसांत ६० हून अधिक सामने होणार आहेत. पुरुषांची स्पर्धा ए आणि बी अशा समान गटात होत असून पुरुषांचे १० संघ आहेत. भारत बी गटात खेळत आहे. महिला डी आणि ई गटात खेळत असून भारताचा संघ ई गटात आहे.
Site Admin | March 17, 2025 8:46 PM | kabaddi Worl Cup 2025
कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी
